Thursday, July 9, 2020

मोबाईल नंबर रजिस्टर नसला तरीही ओरिजिनल आधार मिळवा पोस्टाने घरच्या पत्त्यावर फक्त 50 रुपयात


सर्वप्रथम  खालील वेबसाईट ओपन करा 

https://resident.uidai.gov.in/order-reprint

वेबसाईट ओपन केल्यावर आपल्याला पुढीलप्रमाणे एक स्क्रीन येईल त्यात फोटोत दिल्याप्रमाणे माहिती भरा 



त्यानंतर तुम्हाला तुम्ही वर टाकलेल्या मोबाईल नंबर वर एक  OTP येईल तो टाकून सबमिट केल्यावर पुढील प्रमाणे एक स्क्रीन येईल त्या स्क्रीन वरील मेक पेमेंट बटन वर क्लिक करून आपल्या डेबिट कार्ड , नेट बँकिंग किंवा UPI id द्वारे ५० रु. च पेमेंट करा. 


सक्सेसफुल पेमेंट नंतर पुढील प्रमाणे स्क्रीन येईल त्यातील पावती डाऊनलोड करून ठेवा. आपल आधार कार्ड ७ दिवस ते १५ दिवसाच्या आत स्पीड पोस्टाने आपल्या घरच्या पत्त्यावर येऊन जाईल. 

( टीप : सध्या कोरोना परिस्थितीमुळे आधार कार्ड पोहोचण्यास थोडा उशीर होऊ शकतो ) 









Sunday, July 5, 2020

जून २०२० च्या वीज बिलासंदर्भात महावितरण च ग्राहकांसाठी शंका निरसन




जाणून घ्या आपले वीज बिल ( स्थिर आकार , वीज आकार , वीज शुल्क , इंधन समायोजन आकार इ. )


१ एप्रिल २०२० पासून खालील नवीन वीजदर लागू झालेले आहेत. 

 
आपल वीज बिल किती युनिट वापरल्यावर किती येईल सर्व आकार पकडून हे चेक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून पुढे दिलेल्या फोटो प्रमाणे माहिती भरावी. ( फोटो मध्ये १०० युनिट वीज वापराच बिल दाखवण्यात आल आहे. )




आपण जेवढे युनिट वापरणार तेवढ्या  युनिटच्या वापरावर आपल्याला वीज शुल्क् १६ टक्के प्रमाणे आणि वहन आकार प्रती युनिट प्रमाणे १.४५ रु. दराने लागेल. त्यामुळे जपून वीज वापरा व काळाची गरज म्हणून विजेची बचत  करून पर्यावरणाला हातभार लावा व स्वताचे पैसे सुधा वाचवा. 


आपल चालू महीन्याच बिल , युनिट वापर , इतर आकार  पुढील लिंक आपला १२ अंकी ग्राहक क्रमांक  टाकून जाणून घ्या : https://billcal.mahadiscom.in/consumerbill/




Saturday, July 4, 2020

महाराष्ट्र शासनातर्फे मोफत MPSC ऑनलाईन कोचिंग


डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी), पुणे मार्फत एम.पी.एस.सी.परीक्षेसाठी मोफत ऑनलाईन कोचिंग

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी एम.पी.एस.सी. परीक्षेसाठी ऑनलाईन मार्गदर्शन सुरु करण्यात येणार आहेत.


इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. बार्टी, पुणेच्या www.barti.in संकेतस्थळावर नोटीस बोर्ड मध्ये “एम.पी.एस.सी. परीक्षा मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश अर्ज” वर क्लिक करून अर्ज करावा.


तज्ञ मार्गदर्शकांकडून हे प्रशिक्षण देण्यात येणार असून आपण बार्टी, पुणे च्या फेसबुक पेज व यु ट्यूब चॅनल वरून त्याचे Live Streaming करण्यात येणार आहे.


प्रशिक्षण सुरु होण्याचा दिनांक बार्टी, पुणे च्या फेसबुक पेज लवकरच जाहीर करण्यात येईल.

प्रवेश अर्जाची लिंक : http://barti.in/OnlineCourseForm.php 


पुढील छोटासा  फॉर्म  ओपन होईल त्यात तुम्ही मोबाईल वरून सुद्धा माहिती भरू शकता आणि हे विनामूल्य आहे.  




 






Friday, July 3, 2020

उद्योग आधार ( MSME )

बहुतांश छोटे दुकानदार , लघुउद्योजक (एकल व्यक्ती कंपनी, एलएलपी, प्रा. लि. व लि. कंपन्या वगळून इतर सर्व) हे आपले व्यवसाय स्थानिक पातळीवर रजिस्टर करतात. 

त्यामुळे केंद्र सरकार कडे या उद्योगाची नोंद प्रत्यक्षरित्या केली जात नाही त्यामुळे सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगाचे (MSME) चे लाभ उद्योजकांना मिळत नाहीत. 

कारण एमएसएमई केंद्र सरकारच्या अधिकाराखाली चालणारे खाते आहे. त्यामुळे आपला उद्योग हा MSME मध्ये रजिस्टर / नोंद करण्यासाठी उद्योग आधार हे एक महत्त्वाचे साधन ठरते . 

त्यानंतर या उद्योजकांना MSME चे लाभ मिळतात. 

मुद्रा कर्ज हे सुध्दा MSME साठीच आहे. त्यामुळे आपल्याकडे उद्योग आधार असल्यास मुद्रा कर्ज मिळवताना त्याचा फायदा होतो.

बँकेत करंट अकाउंट ओपन करण्यासाठी सुद्धा उद्योग आधार आवश्यक आहे

उद्योग आधार काढण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स आणि माहिती. : 
१) आधार कार्ड 
२) पॅन  कार्ड 
३) बँक पासबुक 
४) इ मेल आय डी
५) उद्योगाचे नाव 
६) उद्योग स्थापन केल्याची दिनांक 
७) आपला उद्योग कशाबद्दल आहे याची थोडक्यात माहिती. 


उद्योग आधार अर्ज करण्यासाठीची लिंक : https://udyogaadhaar.gov.in/Default.aspx 


Wednesday, July 1, 2020

15 मिनिटात अर्जंट पॅन कार्ड नंबर मिळवा ( PDF )



तुमच्या आधार कार्ड ला मोबाइल नंबर जोडलेला असल्यास नवीन पॅनकार्डचा  नंबर आणि ई पॅनकार्ड ( PDF )  कॉपी  मिळवा  फक्त १५ मिनिटात

हा ऑप्शन फक्त ज्याच्याकडे अगोदर  पॅनकार्ड नाही व ज्याला नवीन  पॅनकार्ड काढायचे आहे त्यासाठी असून जुन्या  पॅनकार्ड च्या दुरुस्तीसाठी नाही. 


ई  पॅन  कार्ड पाहिजे तितक्या वेळा प्रिंट मारून  वापर करता येते आणि ते वैध असून सर्व सरकारी कामासाठी वापरू शकता.

ई पॅन  वैधतेसंबंधी चे  Income Tax ऑफिस च खालील सर्क्युलर वाचा 

❇️ [ e-PAN is a valid proof of PAN. e-PAN contains a QR code having demographic details of PAN applicant such as name, date of birth and photograph. These details are accessible through a QR code reader. e-PAN is duly recognised by Notification No. 7 of 2018 dated 27.12.2018, issued by the Principal Director General of Income-Tax (Systems).]

❇️ या पद्धतीने तुम्हाला pdf कॉपी मिळणार आहे जर तुम्हाला स्मार्ट कार्ड स्वरूपातील पॅन  कार्ड सुद्धा पाहिजे असल्यास वेगळे चार्ज लागतील. ते पोस्टाने आधार कार्ड वरच्या पत्त्यावर येईल. 


फॉर्म भरण्यासाठी लिंक : https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/ApplyePANThroughAadhaar.html


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*घरबसल्या ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क* 

*शशी इंटरनेट पॉईंट* 
गाळा नंबर ७०, पहिला मजला , बाजार समिती गाळे ,
स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम शाळेच्या समोर. 
मुरबाड , जि. ठाणे  
*८९७५१८०३०४ / ८३६९२५११६८*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती

  SBI Clerk Recruitment 2021 एकूण जागा :  5121 जागा  (महाराष्ट्र: 640 जागा) पदाचे नाव:  ज्युनियर असोसिएट ( लिपिक)  (कस्टमर सपोर्ट & सेल्...