Friday, July 3, 2020

उद्योग आधार ( MSME )

बहुतांश छोटे दुकानदार , लघुउद्योजक (एकल व्यक्ती कंपनी, एलएलपी, प्रा. लि. व लि. कंपन्या वगळून इतर सर्व) हे आपले व्यवसाय स्थानिक पातळीवर रजिस्टर करतात. 

त्यामुळे केंद्र सरकार कडे या उद्योगाची नोंद प्रत्यक्षरित्या केली जात नाही त्यामुळे सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगाचे (MSME) चे लाभ उद्योजकांना मिळत नाहीत. 

कारण एमएसएमई केंद्र सरकारच्या अधिकाराखाली चालणारे खाते आहे. त्यामुळे आपला उद्योग हा MSME मध्ये रजिस्टर / नोंद करण्यासाठी उद्योग आधार हे एक महत्त्वाचे साधन ठरते . 

त्यानंतर या उद्योजकांना MSME चे लाभ मिळतात. 

मुद्रा कर्ज हे सुध्दा MSME साठीच आहे. त्यामुळे आपल्याकडे उद्योग आधार असल्यास मुद्रा कर्ज मिळवताना त्याचा फायदा होतो.

बँकेत करंट अकाउंट ओपन करण्यासाठी सुद्धा उद्योग आधार आवश्यक आहे

उद्योग आधार काढण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स आणि माहिती. : 
१) आधार कार्ड 
२) पॅन  कार्ड 
३) बँक पासबुक 
४) इ मेल आय डी
५) उद्योगाचे नाव 
६) उद्योग स्थापन केल्याची दिनांक 
७) आपला उद्योग कशाबद्दल आहे याची थोडक्यात माहिती. 


उद्योग आधार अर्ज करण्यासाठीची लिंक : https://udyogaadhaar.gov.in/Default.aspx 


No comments:

Post a Comment

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती

  SBI Clerk Recruitment 2021 एकूण जागा :  5121 जागा  (महाराष्ट्र: 640 जागा) पदाचे नाव:  ज्युनियर असोसिएट ( लिपिक)  (कस्टमर सपोर्ट & सेल्...