Saturday, April 7, 2018

रेल्वे ग्रुप डी अभ्यासक्रम, मागील प्रश्नपत्रिका - Railway Group D Syllabus

रेल्वे ग्रुप D  भरती अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप आणि मागील प्रश्नपत्रिका 

सदर पदांसाठी कॉम्पुटर वर परीक्षा घेण्यात येईल 

प्रश्नपत्रिकेत १०० प्रश्न असतील ,
प्रत्येक प्रश्नाला ४ पर्याय असतील त्यापैकी १ सिलेक्ट करायचा आहे.  

परीक्षेसाठी वेळ ९० मिनिटे ( दीड  तास ) असेल 
म्हणजेच एक प्रश्न सोडवायला जवळ जवळ ५४ सेकंद  असतील

प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे त्या प्रश्नाच्या गुणांच्या एक तृतीयांश ( १/३) गुण कमी करण्यात येतील त्यामुळे शक्यतो सोपे असलेले प्रश्न लवकर  सोडविण्याचा प्रयत्न करावा. नंतर वेळ राहिल्यास कठीण प्रश्नांकडे वळावे. 

खालील अभ्यासक्रम  आणि पुस्तकाना अनुसरून अभ्यास केला तर नक्कीच ही भरती आपलं सरकारी नोकरीच स्वप्न पूर्ण करू शकते

*खालील 4 विभागांवर 100 प्रश्न  विचारण्यात येतील*

*गणित* : 
संख्या आणि त्यांचे प्रकार , बेरीज , वजाबाकी , गुणाकार  भागाकार,दशांश , अपूर्णांक , ,लसावि  मसावि , गुणोत्तर व प्रमाण , टक्केवारी , वेळ आणि काम , वेळ आणि अंतर,सरळ आणि चक्रवाढ व्याज , नफा तोटा , भूमिती , वर्गमूळ , वय , दिनदर्शिका आणि घड्याळ इत्यादी विषयावरील गणिताचा समावेश असेल 

पुस्तके
१) फास्टट्रॅक  मॅथ्स - सतीश वसे
                 किंवा
२) गणित क्लृप्त्या आणि उत्तरे - पंढरीनाथ राणे 

*बुद्धिमत्ता चाचणी*
नंबर सिरीज , अल्फाबेटिकल सिरीज , नातेसंबंध , वेन डायग्रॅम , निर्णय क्षमता , माहिती विश्लेषण , समानता  आणि विषमता, Coding and Decoding, Mathematical operations, Syllogism, Jumbling, Analytical Reasoning,Classification, Directions, Statement – Arguments and Assumptions इ. विषयावरील प्रश्नांचा समावेश असेल

पुस्तके
१) Quantitative Aptitude  for  Competitive Exams - आर एस अगरवाल
                       किंवा
२) बुद्धिमापन चाचणी - सुजित पवार

*सामान्य विज्ञान* 

इयत्ता १० वी पर्यंतच्या विज्ञान विषयावर आधारित प्रश्नांचा  समावेश असेल. 

पुस्तके
१) ५ वी ते १० वी ची विज्ञान विषयाची पुस्तके
                        किंवा 
२) सामान्य विज्ञान - सचिन भस्के 

*सामान्य ज्ञान*

यात *चालू घडामोडींचा* समावेश असेल खास करून  राजकारण , अर्थशास्त्र , संस्कृती , विज्ञान आणि तंत्रज्ञान , खेळ आणि पुरस्कार आणि इतर काही अत्यंत महत्वाच्या चालू घडामोडींवर आधारित प्रश्नांचा समावेश असेल 

पुस्तके

१) युनिक बुलेटिन मासिक ( मागील 1 वर्षातील आवृत्त्या )

*परीक्षेसाठीचे कॉल लेटर बद्दल रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट वर आणि उमेदवाराच्या ईमेल आय डी वर सूचित करण्यात येईल*




भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती

  SBI Clerk Recruitment 2021 एकूण जागा :  5121 जागा  (महाराष्ट्र: 640 जागा) पदाचे नाव:  ज्युनियर असोसिएट ( लिपिक)  (कस्टमर सपोर्ट & सेल्...